Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लहान मुलांना खेळताना सापडली सोन्याची बिस्किटे!

लहान मुलांना खेळताना सापडली सोन्याची बिस्किटे!कोल्हापूर : खरा पंचनामा

करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथे तळ्याजवळ खेळत असलेल्या मुलांना गवतामध्ये प्लास्टिक पिशवीत ३९४ ग्रॅम वजनाचे सोने सापडले. यामध्ये सोन्याची बिस्किटे आणि नाण्यांचा समावेश आहे. त्याची बाजारभावानुसार किंमत २४ लाख २९ हजार ५०० रुपये इतकी आहे.

गांधीनगर पोलिसांना सुगावा लागताच त्यांनी ती ताब्यात घेतली. संबंधित सोन्यावर अद्याप कोणीही हक्क दाखविण्यासाठी पुढे आलेले नाही. त्यामुळे बेवारस सापडलेले सोने कोणाचे, अशी चर्चा गांधीनगरात सुरू आहे. गडमुडशिंगीतील तळ्याजवळ १६ जुलै रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास रोहित गडकरी, ऋषिकेश गडकरी, चेतन गवळी आणि नागेश कांबळे ही लहान मुले खेळत होती. त्यांना गवतात प्लास्टिकची पिशवी सापडली. त्यात सोनेरी चौकोनी लहान-मोठी बिस्किटे आणि नाणी होती.

त्यांनी पिशवी तशीच विश्वास गडकरी यांच्याकडे दिली; पण तळ्याजवळ सोन्याची बिस्किटे आणि नाणी सापडल्याची चर्चा गावात सुरू झाली. त्याची चाहूल गांधीनगर पोलिसांना लागताच त्यांनी विश्वास गडकरी आणि सुभाष गवळी यांचे घर गाठले. त्याच्याकडे सखोल चौकशी करताना सोने सापडल्याचे सत्य उघड झाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.