Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

देशाच्या नावाचा 'दुरुपयोग' केल्याचा दावा; I.N.D.I.A. च्या 26 सदस्यांविरुद्ध तक्रार!

देशाच्या नावाचा 'दुरुपयोग' केल्याचा दावा; I.N.D.I.A. च्या 26 सदस्यांविरुद्ध तक्रार!



नवी दिल्ली : खरा पंचनामा

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अतापासूनच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी तयारी सुरु केली आहे. विरोधी पक्षांनीही आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. 

दरम्यान, बंगळुरुमध्ये विरोधी पक्षांच्या दोन दिवसांच्या बैठकीनंतर महाआघाडीला नवीन नाव देण्यात आले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी जाहीर केले की, सर्व 26 पक्षांसह आम्ही या आघाडीचे नाव 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स' (इंडिया) असे दिले आहे. I-N-D-I-A ची पुढील बैठक मुंबईत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, I.N.D.I.A. ( इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स) या नावाने विरोधी पक्षांची अडचण वाढवली आहे. 26 राजकीय पक्षांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने देशाच्या नावाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारकर्ते डॉ. अवनीश मिश्रा यांनी 1950 च्या बोधचिन्ह (Emblems Act of 1950) कायद्यातील तरतुदीचा हवाला देत विरोधी पक्षाच्या वतीन दिलेल्या नावावर आक्षेप नोंदवला. विशेष म्हणजे, त्यांनी या कायद्याच्या आधारे तक्रार दाखल केली आहे.

दुसरीकडे, 'INDIA' असे नाव देऊन, या महाआघाडीने त्यांच्या युतीला 'राष्ट्र' म्हणून ओळख देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर, भारतीय मतदारांना या नावाच्या रुपाने आपल्याकडे आकर्षित करण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणून ते भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 171F अंतर्गत येते.

भारतीय दंड संहितेचे हे कलम विशेषत: निवडणुकीत अवाजवी प्रभाव टाकण्याच्या शिक्षेशी संबंधित आहे. आयपीसीच्या कलमानुसार, "निवडणुकीत अवाजवी प्रभाव टाकणाऱ्याला एक वर्षांपर्यंतच्या कारावासाची किंवा दंडाची किंवा दोन्हीची शिक्षा दिली जाते. तसेच, विरोधी पक्षाच्या वतीने हे नाव दिल्याने तमाम भारतीयांच्या भावना नक्कीच दुखावल्या गेल्या आहेत. अशा कृतीमुळे देशातील सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता बिघडू शकते. अवाजवी राजकीय प्रभाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.