Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

1 लाखांची लाच घेताना एपीआय, एएसआयला रंगेहात अटक!

1 लाखांची लाच घेताना एपीआय, एएसआयला रंगेहात अटक!



सातारा : खरा पंचनामा 

परमिट रुममधुन - दारुची अवैध वाहतूक केल्यामुळे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी दीड लाख रुपये लाचेची मागणी करुन एक लाख रुपये लाच स्वीकारताना खटाव तालुक्यातील औंध पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहात पकडण्यात आले. खटाव तालुक्यातील औंध येथील जुना एसटी स्टँड, बाजार पटांगणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. 

सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय परशुराम दराडे, एएसआय बापूसाहेब नारायण जाधव असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत.

तक्रदार यांच्या परमिट रुममधुन दारुची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्यात तक्रारदार यांना मदत करण्यासाठी व त्यांच्या व्यवसायात इथुन पुढे कोणताही त्रास न देण्यासाठी औंध पोलीस ठाण्यातील एपीआय दत्तात्रय दराडे आणे एएसआय बापुसाहेब जाधव यांनी दीड लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती एक लाख रुपये देण्याचे ठरले.

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. लाचेची रक्कम औंध येथील जुना एसटी स्टँड येथील बाजार पटांगणात देण्याचे ठरले. त्यानुसार पथकाने बाजार पटांगणात सापळा रचला. एपीआय दत्तात्रय दराडे यांच्यावतीने एएसआय बापुसाहेब जाधव यांना एक लाख रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. दोघांवर औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.