Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला 10 लाखांची लाच घेताना अटक!

वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला 10 लाखांची लाच घेताना अटक! 



पुणे : खरा पंचनामा 

पुणे महानगरपालिकेच्या नव्याने स्थापन झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सोळा लाख रुपये लाचेची मागणी करून त्यातील दहा लाख रुपये स्वीकारताना डीनला रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सायंकाळी ही कारवाई केली. 

पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात ही कारवाई करण्यात आली. आशिष श्रीनाथ बनगिनवार, (वय 54 वर्ष, डीन (वर्ग-1) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या डीनचे नाव आहे. यातील तक्रारदार यांचा मुलगा NEET परिक्षा - 2023 मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एम.बी.बी.एस.च्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या राऊंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालय, पुणे येथे इन्स्टिट्यूशनल कोटामधून निवड झाली होती. यासाठी 22 लाख 50 हजार रुपये इतके प्रवेश शुल्क होते. मात्र महाविद्यालयाचे डीन त्यांनी 16 लाख रुपये लाचेच्या स्वरूपात मागितले होते. 

दरम्यान तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात याची तक्रार केली होती. दरम्यान लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता आशिष बनगिनवार यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मागील दोन दिवसांपासून प्रतिबंधक विभागाचे अधिकारी बनगिनवार यांच्या मागावर होते. दरम्यान आज सायंकाळच्या सुमारास त्यांच्या कार्यालयात दहा लाख रुपयांची लाख स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.