Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

इचलकरंजीतील दुचाकी चोरट्याला अटक : 4 दुचाकी जप्त कुरुंदवाड पोलिसांची कारवाई

इचलकरंजीतील दुचाकी चोरट्याला अटक : 4 दुचाकी जप्त
कुरुंदवाड पोलिसांची कारवाई



कुरुंदवाड : खरा पंचनामा

कुरुंदवाड परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या इचलकरंजी येथील एका तरूणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीच्या 4 दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती कुरुंदवाडचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांनी दिली.


अजय संजय बोटे (वय 26 रा.इचलकरंजी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी चोरीतील संशयितांना पकडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कुरुंदवाडचे सहायक निरीक्षक श्री. फडणीस यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला सूचना दिल्या होत्या. 

पथक हेरवाड येथे गस्त घालत असताना एक तरुण यामाहा दुचाकीवरून संशयास्पदरित्या जाताना दिसला.पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने 4 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीच्या 4 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आल्या आहेत.

सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर पवार, अनिल चव्हाण, विवेक कराडे, सागर खाडे, शिरीष कांबळे, सद्दाम शेख, फारुक जमादार, संतोष साबळे, अरुण नागरगोजे, राजेंद्र सानप आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.