विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार
मुंबई : खरा पंचनामा
विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची आज निवड झाली. तर विधीमंडळ पक्षनेतेपदी बाळासाहेब थोरात कायम आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर विरोधी पक्ष नेतेपदावर काँग्रेसने दावा केला होता. आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली.
शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत नाही तोच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आमदारांचा एक गट घेऊन पक्षाच्या बाहेर पडत सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे विधानसभेत मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळणार असल्याचे स्पष्ट झाले होते.
काँग्रेसकडून या पदासाठी विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सुनील केदार यांच्या नावांची चर्चा होती. मात्र अखेर विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.