Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

डॉक्टरचे अपहरण करून घरात घातला दरोडा! पत्नी, मेहुण्यावर संशय

डॉक्टरचे अपहरण करून घरात घातला दरोडा!
पत्नी, मेहुण्यावर संशय



पुणे : खरा पंचनामा

कुत्रा आजारी असल्याचे सांगून व्हेटर्नरी डॉक्टरला बोलावून त्याचे अपहरण करण्यात आले. त्याला जबरदस्तीने त्याच्या घरात नेऊन सोन्याचे दागिने, २५ लाख रुपये रोख असा २७ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याचा प्रकार वडकी येथे घडला.

याप्रकरणी डॉक्टराने लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार वडकी येथील पवार वस्तीत बुधवारी सायंकाळी पावणेपाच वाजता घडला. फिर्यादी व्हेटर्नरी डॉक्टर आहेत. त्यांचा व पत्नीचा न्यायालयात घटस्फोटासाठी खटला सुरु आहे. त्यात मालमत्तेचा वादही आहे. त्यांना बुधवारी वडकी येथील पवार वस्तीत कुत्रे आजारी असल्याचे सांगून उपचारासाठी बोलावले. त्यानुसार डॉक्टर तेथे गेले.

तेव्हा १० जणांना विचारणा केली. त्यातील २ ते ३ जणांनी त्यांना एका कारमध्ये जबरदस्तीने बसवून अपहरण केले. त्यांना दिवे घाटमार्गे वनपुरी आंबोडी, वाघापूर या ठिकाणी नेऊन जीवे मारण्याची धमकी दिली. चाकूने हाताला दुखापत केली. पैसे कोठे आहेत, अस म्हणून गळ्याला व पोटाला चाकू लावून तुझ्या नावाची तुझी पत्नी व मेव्हण्याने सुपारी दिली आहे. तुला आम्ही संपवून टाकणार आहे, अशी धमकी दिली. तू आम्हाला २० लाख रुपये दिले तर तुला आम्ही सोडू, तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही, असे सांगितले.

त्यानंतर त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरी नेले. त्यांचा मोबाईल व घराच्या चाव्या जबरदस्तीने घेतल्या. घरातून २ लाख १० हजार रुपयाचे सोन्याचे दागिने व रोख २५ लाख रुपये असे २७ लाख १० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. त्यांना घेऊन चोरटे पुन्हा शिंदवणे घाटात आले. तेथे या डॉक्टरांना सोडून ते पळून गेले. फिर्यादीच्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.