Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजितदादा मुंबईला पोहोचला असाल तर कोल्हापुरात आयुक्त पाठवून द्या!

अजितदादा मुंबईला पोहोचला असाल तर कोल्हापुरात आयुक्त पाठवून द्या!कोल्हापूर : खरा पंचनामा

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कोल्हापूरला एक चांगला आयुक्त देऊ, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना दिले होते. पण अद्यापही कोल्हापुरला आयुक्त न मिळाल्याने आम आदमी पक्षाने आयुक्त मिळण्यासाठी पोस्टरच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

आम आदमी पक्षाच्या युवा आघाडीच्या वतीने पोस्टर कॅम्पेन राबवत "दादा, मुंबईला पोचलासा काय? पोचला असला तर कोल्हापूरला आयुक्त पाठवून द्या" अशा आशयचे पोस्टरबाजी करून शहरातील छ. शिवाजी चौक, दसरा यासारख्या विविध चौकात लावून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

गेल्या अडीच महिन्यांपासून कोल्हापूरचे आयुक्तपद रिक्त असून जिल्हाधिकारी राहुल रेखावार प्रभारी प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. कोल्हापूरला पूर्णवेळ आयुक्त मिळावा, अशी मागणी आम आदमी पार्टीने लावून धरली आहे.

"शासन आपल्या दारी, पण आयुक्त नाही कोल्हापूरनगरी", "सरकार एका रात्रीत बनतंय, मग आयुक्त द्यायला 3 महिने का" असे पोस्टर झळकवत महानगरपालिकेला आयुक्त मिळावा यासाठी आप युवा आघाडीने हे पोस्टर कॅम्पेन राबवले असल्याचे युवा शहराध्यक्ष मोईन मोकाशी यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.