मारहाणीत जखमी झालेल्या रामापूरच्या एकाचा मृत्यू
चिंचणी-वांगी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल
सांगली : खरा पंचनामा
किरकोळ कारणातून झालेल्या वादातून मारहाणीत जखमी झालेल्या रामापूर येथील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवारी मारहाणीची घटना घडली होती. याप्रकरणी एकावर चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित आनंदा माळी असे संशयिताचे नाव आहे. तर सुरेश राजाराम पाटील असे मृताचे नाव आहे. मारहाण झाल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत पाटील याला कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. आज सोमवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सुरेश पाटील व संशयित रोहित माळी यांच्यात शनिवारी सायंकाळी वादावादी व हाणामारी झाली. स्थानिकांनी वाद सोडवला. नंतर काही वेळाने संशयिताने जखमीस पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात सुरेश गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
संशयित पसार झाला असून पोलिस शोध घेत आहेत. चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक एस. एल. साळुंखे तपास करीत आहेत
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.