Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

स्वातंत्र्यदिनी कोल्हापुरात अजितदादा करणार ध्वजारोहण!

स्वातंत्र्यदिनी कोल्हापुरात अजितदादा करणार ध्वजारोहण!



मुंबई : खरा पंचनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे  नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, आज स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील जिल्ह्यांच्या मुख्यालयात ध्वजारोहण करणाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील ध्वजारोहण करणार आहेत.

राज्य शासनाने जाहिर केलेल्या परित्रकानुसार राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूर येथे ध्वजारोहण करणार आहेत. तर देवेंद्र फडणवीस नागपूर येथे ध्वजारोहण करणार आहेत. याशिवाय छगन भुजबळ अमरावती येथे, सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर येथे, दिलीप वळसे पाटील वाशिम येथे, राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर येथे, हसन मुश्रीफ सोलापूर येथे ध्वजारोहण करणार आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.