Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चोरलेले, हरवलेले १४ लाखांचे १३८ मोबाईल जप्त! सांगलीच्या सायबर पोलिसांची कारवाई

चोरलेले, हरवलेले १४ लाखांचे १३८ मोबाईल जप्त!
सांगलीच्या सायबर पोलिसांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

गेल्या महिन्याभरात चोरलेले, हरविलेले १४ लाखांचे १३८ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. हे मोबाईल फिर्यादीना परत करण्यात येत असल्याचे सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय हिरूगडे यांनी सांगितले.

सायबर शाखेने ऑनलाईन फसवणुकीतील अनेक गुन्ह्याचा तपास पूर्ण केला आहे. आता या शाखेकडून चोरी व गहाळ झालेले मोबाईल शोधण्याची मोहिम हाती घेतली आहे. यासाठी सायबर पोलिस ठाण्याअंतर्गत मोबाईल थेप्ट युनीट स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे गहाळ झालेल्या मोबाईलचा तांत्रिक माहितीद्वारे तपास करण्यात आला. यात महिन्याभरात पाच लाख किंमतीचे ५० मोबाईल मिळून आले. तसेच सायबर पोलिसांनी विविध पोलिस ठाण्यांना तांत्रिक माहिती पुरवून ८८ मोबाईल हस्तगत करण्यास मदत केली.

यात कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याकडील १२, महात्मा गांधी चौक कडील २७, इस्लामपूर पोलिस ठाणे २७ आणि विटा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २२ मोबाईलचा समावेश आहे. महिन्याभरात १३८ मोबाईलचा शोध घेतला आहे. जानेवारी महिन्यात १५० मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले होते. आताही हस्तगत केलेले मोबाईल फिर्यादीना परत करण्यात येत आहेत.

पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहिदास पवार, करण परदेशी, विवेक साळुंखे, अजय पाटील, स्वप्नील नायकोडे, कॅप्टन गुंडवाडे, इम्रान मलकारी, रुपाली पवार, रेखा कोळी, सलमा इनामदार आदींनी ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.