Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लग्न जमवत नाहीत म्हणून मुलाने केला वडिलांचा खून!

लग्न जमवत नाहीत म्हणून मुलाने केला वडिलांचा खून!पंढरपूर : खरा पंचनामा

वडील लग्न जमवत नसल्याने संतप्त मुलाने वडिलांच्या डोक्यात फरशी मारून वडिलांच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

गोपिचंद उर्फ जितू हुकुम कदम (वय २८, रा. भगवान नगर, पंढरपूर) असे संशयिताचे नाव आहे. हुकुम माणिक कदम (वय ५८) असे मृताचे नाव आहे. गोपिचंद हा वडिलांकडे लग्न करुन द्या म्हणून हट्ट धरून बसला होता. रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास गोपिचंद याने हुकुम कदम यांना "तू माझे लग्न करीत नाही, तुला मी आता ठेवत नाही' असे म्हणून शिवागाळ सुरू केली. त्याचबरोबर त्याने हुकूम यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने घरासमोर पडलेले फरशाच्या तुकडयाने व लाकडी फळीच्या तुकडयाने तोंडावर मारहाण केली. या मारहाणीत हुकुम गंभीर जखमी झाले.

वडीलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाली होती. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.