Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजित पवार गट राज्यात सक्रीय, ३६ जिल्ह्यांची जबाबदारी राष्ट्रवादीच्या १० मोठ्या नेत्यांवर!

अजित पवार गट राज्यात सक्रीय, ३६ जिल्ह्यांची जबाबदारी राष्ट्रवादीच्या १० मोठ्या नेत्यांवर!



पुणे : खरा पंचनामा

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांनी महाराष्ट्र दौरा करण्यास सुरूवात केली आहे. येवल्यानंतर शरद पवारांनी बीडमध्ये सभा घेत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. यानंतर आता अजित पवार गट देखील सक्रिय झाला असून अजित पवार गटातील महत्वाच्या नेत्यांकडे राज्यातील ३६ जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामध्ये अजित पवारांसह, प्रफुल्ल पटेल यांच्याकडेही जबाबदारी देण्यात आलीय.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची राज्यात नव्यानं संघटनात्मक बांधणी केली जात आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह राज्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये पक्ष आणि संघटनवाढीची जबाबदारी देण्यात आलीय. यामध्ये अजित पवार यांच्याकडे पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर, तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, व नागपूरची जबाबदारी देण्यात आलीय.

पक्ष संघटनेकरता जबाबदारी दिलेले जिल्हे खालीलप्रमाणे अजित पवार - पुणे, सातारा, सांगली व सोलापूर प्रफुल पटेल - भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, व नागपूर छगन भुजबळ - नाशिक, मुंबई शहर व मुंबई उपनगर.

दिलीप वळसे पाटील - अकोला, वाशीम, छत्रपती संभाजीनगर व बुलढाणा. हसन मुश्रीफ - कोल्हापूर, सिंधुदूर्ग, व अहमदनगर. धनंजय मुंडे - बीड, परभणी, नांदेड, व जालना. संजय बनसोडे - हिंगोली, लातूर, व उस्मानाबाद. अदिती तटकरे - रायगड, रत्नागिरी, ठाणे व पालघर. अनिल पाटील - जळगाव, धुळे, व नंदुरबार. धर्मारावबाबा आत्राम - गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.