Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सरकारी कामात अडथळ्याचा गुन्हा आता जामीनपात्र!

सरकारी कामात अडथळ्याचा गुन्हा आता जामीनपात्र!



मुंबई : खरा पंचनामा

अधिकाऱ्यांकडून सरकारी कामात अडथळा कलमाचा गैरवापर होत आहे. या पार्श्वभूमीवर लोकांकडून करण्यात येणाऱ्या मागणीनुसार राज्य सरकारकडून भारतीय दंड संहिता कलम 353 मध्ये (सरकारी कामात अडथळा) सुधारणा केली आहे. या सुधारणेनुनार आता हे कलम जामीनपात्र करण्यात आले आहे. तसेच याअंतर्गत शिक्षेची तरतूद पाचवरून दोन वर्षे करण्यात आली आहे.

लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करणे, धमकावणे, हल्ला किंवा फौजदारीपात्र बळाचा प्रयोग करणे, याबाबत भारतीय दंड संहितेतील कलम 353 मध्ये पूर्वी पाच वर्षे शिक्षेची तरतूद व या कलमांतर्गत दाखल होणारा गुन्हा अजामीनपात्र होता. शिवाय, या कलमाखाली दाखल खटला सत्र न्यायालयात चालविला जात होता. पण आता भारतीय दंड संहिता, 1980 आणि फौजदारी प्रक्रिया संहिता 1873 या महाराष्ट्रात लागू असलेल्या कायद्यात सुधारणा करण्यासंबंधीचे विधेयक विधानसभेत मांडण्यात आले. त्यानुसार भारतीय दंड संहितेच्या कलम 353 मध्ये व फौजदारी प्रक्रिया संहितेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. याबाबतचा अध्यादेश शासनाने काढला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.