Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कटरने केले मुलाचे तुकडे : स्वतः झाला पोलिसांत हजर मिरजेतील घटना

कटरने केले मुलाचे तुकडे : स्वतः झाला पोलिसांत हजर
मिरजेतील घटना



मिरज : खरा पंचनामा

मुलाच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून बापानेच मुलाचे कटरने तुकडे करून त्याचा खून केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. मिरजेतील गणेश तलाव परिसरात गुरुवारी सकाळी ही घटना घडली. दरम्यान शुक्रवारी दुपारी बाप स्वतःहुन मिरज शहर पोलिस ठाण्यात हजर झाला. मुलाच्या मृतदेहाचे तुकडे त्याने मिरजेसह सुभाषनगर येथे टाकल्याची कबुली दिल्याची माहिती मिरज शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी दिली.

रोहित राजेंद्र हंडीफोड (वय 26) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील राजेंद्र यलाप्पा हंडीफोड (वय 51) पोलिसांत हजर झाले आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम मिरज शहर पोलिस ठाण्यात सुरू आहे.

हंडीफोड कुटुंब मिरजेतील गणेश तलाव परिसरात राहतात. राजेंद्र यांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे. घरी राजेंद्र त्यांची पत्नी आणि मुलगा रोहित राहतात. राजेंद्र यांच्या मुलीचा विवाह झाला असून ती सासरी राहते. रोहित कोणताही कामधंदा करत नव्हता. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. या व्यसनामुळे तो बरेच दिवस घरीही जात नव्हता. त्याच्या व्यसनाला कुटुंबीय कंटाळले होते.

संशयित राजेंद्र यांची पत्नी माहेरी गेली होती. गुरुवारी सकाळी घरात कोणीही नसल्याचे पाहून राजेंद्र यांनी नशेत असणाऱ्या मुलाचे कटरने तुकडे केले. घरातील बाथरूममध्ये राजेंद्र यांनी मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर हात-पाय जवळच असलेल्या गणेश तलावात फेकून दिले. तर उर्वरित धड त्यांच्याच सुभाषनगर येथील शेतात टाकून दिले.

ही घटना घडल्यानंतर संशयित राजेंद्र अस्वस्थ होते. शुक्रवारी त्यांनी आपल्या कृत्याबाबत मेहुण्याला माहिती दिली. त्यानंतर त्यांचा मेहुणा त्यांना घेऊन मिरज शहर पोलिस ठाण्यात हजर झाला. ही घटना समजल्यानंतर मिरज शहरचे पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी पथके पाठवली आहेत.

दोन दिवसांपूर्वी खरेदी केले कटर
दारुडा मुलगा रोहित याच्या व्यसनाला त्याचे कुटूंबीय कंटाळले होते. पत्नी माहेरी गेल्यानंतर संशयित राजेंद्र यांनी दोन दिवसांपूर्वी बाजारातून कटर खरेदी केले होते. मुलाला संपवायचेच या हेतूनेच त्यांनी ते खरेदी केले असावे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.