Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शिकाऊ, पक्क्या लायसेन्ससाठी तालुकानिहाय शिबीर

शिकाऊ, पक्क्या लायसेन्ससाठी तालुकानिहाय शिबीर 



सांगली : खरा पंचनामा 

येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) मार्फत या ऑगस्ट महिन्यामध्ये शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्तीसाठी तालुकानिहाय शिबीर घेण्यात येणार आहेत. 

इस्लामपूर येथे 7 आणि 21 ऑगस्ट, विटा येथे 8 आणि 22 ऑगस्ट, कडेगाव येथे 17 ऑगस्ट रोजी शिबीर घेण्यात येणार आहे. पलूस येथे 29 ऑगस्ट रोजी, आष्टा येथे 1, 14 व 28 ऑगस्ट रोजी शिबिर होईल. 

आटपाडी येथे 9 व 23 ऑगस्ट, जत तालुक्यासाठी 2 व 24 ऑगस्ट, शिराळा येथे 3 ऑगस्ट, तासगावमध्ये 10 व 31 ऑगस्ट रोजी, कवठेमहांकाळ येथे 25 ऑगस्ट रोजी हे शिबिर होणार आहे.


कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.