Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला! चकलांबा पोलिसांनी दाखवली सतर्कता : दोघांना अटक

अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला!
चकलांबा पोलिसांनी दाखवली सतर्कता : दोघांना अटकबीड : खरा पंचनामा

सध्या सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे अल्पवयीन मुलांवर मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीचे सावट ओढवल्याचे  पावयास मिळत आहे अशाच प्रकारची घटना काल बीड जिल्ह्यातील उमापूर येथे एका अल्पवयीन मुलीच्या बाबतीत घडली. पीडित अल्पवयीन मुलीस सोशल मीडियाच्या माध्यमातून जाळ्यात ओढून तिला वेगवेगळ्या प्रकारचे अमिष दाखवून, फुस  लावून, जबरदस्तीने पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. पीडित मुलीच्या ओरडण्यामुळे व उमापुरातील जागरूक नागरिकांमुळे सदरचा प्रकार हाणून पाडण्यास चकलांबा पोलिसांना यश आले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. 

समाधान उर्फ अभिजीत नागनाथ ठोंगे  (वय 26) प्रमोद बाळासाहेब लोखंडे (वय 29, दोघेही रा. हिंगणगाव, जिल्हा उस्मानाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ टीम रवाना केली. पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना ते शक्य झाले नाही. पोलिसांनी खाक्या दाखवत दोन्ही संशयितांना गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह ताब्यात घेऊन पीडित मुलीची सुटका केली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात अपहरण, विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सहायक निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय तांगडे, श्री. एकाळ, श्री. पवार, श्री. कुलकर्णी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.