Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

केरळ पोलिसांनी कर्नाटक पोलिस पथकाला केली अटक!

केरळ पोलिसांनी कर्नाटक पोलिस पथकाला केली अटक!



बंगळुरू : खरा पंचनामा

केरळमधील क्रिप्टो करन्सी घोटाळ्यातील आरोपींना अटक करण्यासाठी केरळमध्ये गेलेल्या कर्नाटक पोलिसांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील संशयितांना सोडण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी 25 लाखांची मागणी केली होती. ते पैसे घेऊन जात असताना कर्नाटक पोलिसांच्या पथकाला अटक करून त्यांच्या वाहनातील पैसेही जप्त करण्यात आले आहेत.

क्रिप्टो करन्सी घोटाळ्यातील आरोपींना अटक कर्नाटक पोलिसांचे एक पथक केरळ येथे गेले होते. त्यावेळी कर्नाटक पोलिसांनी प्रकरण मिटवण्यासाठी त्यांच्याकडे 25 लाखांची मागणी केली होती. त्यांच्याकडून पैसेही घेतले.

याबाबत केरळ पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी उपनिरीक्षकासह कर्नाटक पोलिसांच्या पथकाला अटक केली आणि त्यांच्या वाहनातून पैसे जप्त केले आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.