Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पूर्वीच्या भांडणावरून तरुणाचा सिनेस्टाईल खून! कवठेमहांकाळ बसस्थानकावर घडली घटना

पूर्वीच्या भांडणावरून तरुणाचा सिनेस्टाईल खून!
कवठेमहांकाळ बसस्थानकावर घडली घटना



कवठेमहांकाळ : खरा पंचनामा

पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून कवठेमहांकाळ बसस्थानकात तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून सिनेस्टाईल खून करण्यात आला. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. 

धुळा कोंडीबा कोळेकर (वय२३, रा. आरेवाडी ता. कवठेमहांकाळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका संशयिताचा शोध सुरू आहे.

आरेवाडी येथील धुळा कोळेकर कवठेमहांकाळ येथील एका कॉलेजमध्ये परीक्षा देण्यासाठी आला होता. परीक्षा झाल्यानंतर तो आरेवाडीला जाण्यासाठी बसस्थानकावर बसला होता. त्याचे आणि हल्लेखोरातील एका तरुणाचे दोन महिन्यापूर्वी किरकोळ भांडण झाले होते. 

मृत धुळा कोळेकर याच्या बरोबर एका हल्लेखोरातील खून होण्याच्या अगोदर शुक्रवारी पुन्हा एकदा किरकोळ भांडण झाले होते. एकमेकांकडे खुन्नस नजरेने पाहत होते. यावेळी हल्लेखोरांनी कवठेमहांकाळ येथील बस स्थानकातील प्रवासी व कॉलेज विद्यार्थ्यासमोरच कोळेकर याच्यावरती धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.

गंभीर जखमी धुळा कोळेकर याला उपचारासाठी मिरज येथे शासकीय रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला.
मिरज येथील शासकीय रुग्णालयासमोर आरेवाडी सह त्यांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याबाबत धुळा कोळेकर याचा चुलत भाऊ युवराज हरी कोळेकर (वय२८) याने फिर्याद दिली आहे.

बघ्यांनी केले शूटिंग!
कवठेमहांकाळ बस स्थानकात धुळा कोळेकर या तरुणावर खुनी हल्ला होत असताना जवळच प्रवासी व कॉलेजमधील विद्यार्थी उपस्थित होते परंतु या सर्वांनी हल्ल्याच्या दरम्यान कोणीच प्रतिकार केला नाही तसेच हल्ला झाल्यावर कोळेकर हा तरुण बस स्थानकात तडफडत होता परंतु त्याला लवकर उपचारासाठी रुग्णालयामध्ये कोणी घेऊन गेले नाही पण हल्ला करतेवेळी काहीनी मोबाईलवर शूटिंग केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.