Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत तलाठी परीक्षेवेळी कॉपीचा प्रयत्न : औरंगाबाद येथील एकजण ताब्यात

सांगलीत तलाठी परीक्षेवेळी कॉपीचा प्रयत्न : औरंगाबाद येथील एकजण ताब्यातसांगली : खरा पंचनामा

सांगली येथील तलाठी परीक्षेत कॉपी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणास महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. हा तरुण औरंगाबाद येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

गणेश रतन नागलोत (वय २३ रा. लांडकवाडी जि. औरंगाबाद) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी नायब तहसीलदार आशिष लक्ष्मण सानप यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या गट क संवर्गातील तलाठी भरतीची परीक्षा सध्या घेण्यात येत आहे. सांगलीतील मिरज रोडवर असणाऱ्या वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट येथे एका खाजगी संस्थेमार्फत या परीक्षा घेण्यात येत आहेत. नायब तहसीलदार आशिष सानप हे केंद्र निरीक्षक म्हणून याठिकाणी होते. सकाळी सव्वाआठच्या सुमारास परीक्षा सुरु होण्यापूर्वी सानप हे उमेदवारांची तपासणी करत होते. परीक्षार्थीने ओळखपत्र, हॉल तिकीट पाहून त्यांच्याकडे असणाऱ्या साहित्यांची तपासणी करत होते. 

यावेळी संशयित परीक्षार्थी गणेश नागलोत हा परीक्षा देण्यासाठी आला होता. त्याची तपासणी करत असताना त्याने परीक्षा गृहाच्या आवारात साहित्याची बॅग ठेवली होती. त्या बॅगबाबत संशय आला असता त्यांनी बॅगची तपासणी केली. यावेळी त्यात मोबाईल, एक हेडफोन, प्लास्टिक डबीमध्ये डिव्हाईस, डिव्हाईसचे दोन बारीक सेल, तीन सिमकार्ड असे साहित्य मिळाले. या साहित्याबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. यावेळी संशय आल्याने त्याला पकडून विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.  

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.