Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एसटीच्या राज्यभरातील सर्व चालकांची होणार मद्यपान चाचणी!

एसटीच्या राज्यभरातील सर्व चालकांची होणार मद्यपान चाचणी!



मुंबई : खरा पंचनामा

राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे वाढते अपघात लक्षात घेता बस चालकांची मद्यपान चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ही मोहीम गुरुवारी पहाटे ५ वाजतापासून सुरू झाली आहे. शुक्रवारी सकाळी ७ पर्यंत राज्यभरातील सर्व १०० टक्के चालकांची मद्यपान चाचणी केली जाणार आहे.

चालकांनी कर्तव्यावर असताना मद्यपान केल्याबाबतची प्रकरणे अलिकडच्या काळात आढळून आली. परिवहन महामंडळात बहुतांशी आगारात अल्कोटेस्ट मशीन दिल्या असताना स्थानकावर, तसेच मार्गतपासणी दरम्यान मद्यपान करणाऱ्या चालकांची तपासणी होत नाही. याबाबतचे परिपत्रकच काढण्यात आले होते.

त्याची अंमलबजावणी होत नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. त्यामुळे आता महामंडळातील सर्व मार्गावरील प्रामुख्याने महामार्गावरील बसेस मध्यम व लांब पल्यांच्या बसेस, रात्रीच्या प्रवास करणाऱ्या बसेस यावरील चालकांची १०० टक्के मद्यपान तपासणी करण्यासाठी दोन दिवसांची मोहीम राबविली जात आहे. सुरक्षा व दक्षता शाखा व वाहतूक शाखा यांच्यासह संयुक्त तपासणी कार्यक्रम संपूर्ण राज्यभर राबविला जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.