Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विवाहित परीचारिकेला आत्महत्येस प्रवृत्त केले : वकीलास अटक

विवाहित परीचारिकेला आत्महत्येस प्रवृत्त केले : वकीलास अटक 



विटा : खरा पंचनामा 

येथील विवाहित परीचारिकेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका तरुणाला मृत्यूप्रकरणी एका वकीलास अटक करण्यात आली आहे. विटा पोलिसांनी ही कारवाई केली. 

अॅड. ऋषिकेश आनंद सुर्यवंशी (वय २६, रा. विटा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कोमल बिसुरकर असे मृत परीचारिकेचे नाव आहे. विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्या परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. याबाबत या महिलेचा भाऊ प्रतीक सुरेश सावंत (रा.विटा) यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली होती. 

कोमल या येथील निलसागर हॉटेलच्या मागे भाड्याने खोली घेऊन राहत होत्या. संशयित अॅड. ऋषिकेश सूर्यवंशी हा तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण करण्याच्या हेतूने सतत तिचा पाठलाग करीत होता. घरी आणि ती काम करीत असलेल्या ठिकाणी ये-जा करत असल्याने त्याच्या त्रासास कंटाळून कोमल यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी ॲड. ऋषिकेश सुर्यवंशी याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.