Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अटकेतील चार संशयितांना पोलिसांकडून स्पेशल ट्रिटमेंट!

अटकेतील चार संशयितांना पोलिसांकडून स्पेशल ट्रिटमेंट! 



कोल्हापूर : खरा पंचनामा 

अटकेतील संशयितांना वैद्यकीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये आणण्यात आल्यानंतर पोलिसांच्या परवानगीने स्पेशल ट्रिटमेंट दिल्याचा प्रकार उघडकीस आला. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात गोरक्षकाचा पाठलाग करून बेदम मारहाण केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. या चार संशयितांना पेठवडगाव पोलिसांकडून विशेष ट्रीटमेंट पुरवण्यात आली. 

न्यायालयीन कोठडीत रवानगी झालेल्या संशयितांना वैद्यकीय चाचणीसाठी कोल्हापुरात सीपीआरमध्ये आणले असता, पोलिसांच्या परवानगीने मोबाईल पुरवण्यात आला. त्यामुळे पोलिसांसमोर थाटामध्ये संशयित मोबाईलवर गप्पा मारत होते. बुधवारी संध्याकाळी घडलेला हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

चार दिवसांपूर्वी किणी टोल नाका येथे एका गोरक्षकास तीन ते चार जणांनी पाठलाग करून बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पेठवडगाव पोलिसांनी तिघांना अटक केली. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर तिन्ही संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. त्यानंतर कारागृहात सोडण्यापूर्वी संशयितांना बुधवारी वैद्यकीय चाचणीसाठी सीपीआरच्या अपघात विभागात आणले होते. 

सीपीआरमध्ये पोहोचताच संशयितांना नातेवाईक आणि मित्रांनी गराडा घातला. पोलिसांच्या परवानगीने संशयितांना मोबाईल उपलब्ध झाले. वैद्यकीय चाचणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संशयितांच्या मोबाईलवरून गप्पा सुरू होत्या. बेड्या घातलेल्या संशयितांना पोलिसांकडून मिळत असलेली विशेष ट्रीटमेंट पाहून उपस्थित आश्चर्यचकित झाले. त्यामुळे पोलीस कोठडीत चौकशी झाली की, नुसताच फार्स करण्यात आला, अशी शंका उपस्थित झाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.