Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीच्या एसपींनी घालून दिला तंदुरुस्तीचा धडा! 'त्या' वादग्रस्त वर्षा पर्यटनाच्या आठवणी झाल्या ताज्या

सांगलीच्या एसपींनी घालून दिला तंदुरुस्तीचा धडा!
'त्या' वादग्रस्त वर्षा पर्यटनाच्या आठवणी झाल्या ताज्या



सांगली : खरा पंचनामा

सांगलीचे पोलिस अधीक्षक म्हणून पदभार घेतल्यानंतर डॉ. बसवराज तेली यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. नुकतीच त्यांनी कुंडल (ता. पलूस) येथे क्राईम मीटिंगचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी, अंमलदार यांना आरोग्यवधर्नाचा धडा दिला. याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. वन विभागासह अन्य विभागांची परवानगी घेऊन त्यांनी अधिकाऱ्यांसाठी ट्रेकिंगचे नियोजन केले होते. या घटनेनंतर सांगलीतील तत्कालीन एका एसपींनी केलेल्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबासह केलेल्या वर्षा पर्यटनाची आठवण झाल्याचे अनेकांनी सांगितले.


पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी मासीक क्राईम मीटिंग जिल्ह्यातील विविध भागात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या महिन्यातील क्राईम मीटिंगचे दोन दिवसांपूर्वी कुंडल येथे आयोजन करण्यात आले होते. मीटिंग सुरू करण्यापूर्वी डॉ. तेली यांनी उपस्थित सर्व अधिकारी, अंमलदार यांच्यासाठी ट्रेकिंग करण्याचे अनिवार्य केले होते. ही मीटिंग घेण्यापूर्वी त्यांनी वन विभागाकडून रितसर परवानगी घेतली होती. त्यांच्याशी पत्रव्यवहार करून वन विभागाच्या हॉलमध्ये या मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते.

मीटिंगसाठी संबंधित हजर झाल्यानंतर डॉ. तेली यांनी सर्वांना ट्रेकिंग करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार स्वतः तेली यांच्यासह सर्वांनी ट्रेकिंगचा थरार अनुभवला. पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी शारिरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी त्यांनी हा उपक्रम राबवला. ट्रेकिंग झाल्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात क्राईम मीटिंग घेतली. आणि याबाबतची माहितीही सांगली पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर देण्यात आली.

त्यानंतर मात्र यापूर्वी जिल्ह्यात असलेल्या तत्कालीन एसपींनी क्राईम मीटिंगच्या नावाखाली सहकुटुंब केलेल्या वर्षा पर्यटनाची आठवण सांगलीकरांना झाली. वन विभाग तसेच अन्य विभागांची परवानगी न घेता तत्कालीन एसपींनी केलेले वर्षा पर्यटन चांगलेच वादात सापडले होते. त्यावर बऱ्याच चर्चा झाल्या होत्या. शिवाय बरेच दिवस वर्षा पर्यटनाचा तो विषय चर्चेतही होता. सध्याच्या एसपींनी क्राईम मीटिंगवेळी केलेल्या ट्रेकिंगमुळे सांगलीकरांच्या त्या आठवणी जाग्या झाल्या.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.