Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चांदोली धरणावर पोलिस बंदोबस्त, गस्तीमध्ये वाढ! पर्यटकांची गर्दी, धरणाच्या रेकीमुळे खबरदारी : उपअधीक्षक चव्हाण

चांदोली धरणावर पोलिस बंदोबस्त, गस्तीमध्ये वाढ!
पर्यटकांची गर्दी, धरणाच्या रेकीमुळे खबरदारी : उपअधीक्षक चव्हाण



सांगली : खरा पंचनामा

पुणे येथे पकडण्यात आलेल्या अतिरेक्यांनी चांदोली धरणाची रेकी केल्याची माहिती आहे. शिवाय आता धरण आणि अभयारण्य परिसरात पर्यटकांची गर्दीही वाढली आहे. त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून चांदोली परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे तसेच गस्तही घालण्यात येत असल्याची माहिती इस्लामपूरचे पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिली.

इसिस या दहशतवादी संघटनेच्या दोन अतिरेक्यांना पुणे येथे दहशतवाद विरोधी पथकाकडून अटक केली होती. या अतिरेक्यानी कोल्हापूर येथील महामार्ग नजीकच्या एका गावातील घरात वास्तव्य केले होते. त्यांनी तेथूनच एक दिवस चांदोली धरण परिसरात राहून या धरणाची रेकी केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

महाराष्ट्रातील क्रमांक दोनच्या या मातीच्या धरणाची दहशतवाद्यांनी कोणत्या उद्देशाने रेकी केली असेल हे तपासात उघड झालेले नाही. काही दिवसांपूर्वी आंबोली परिसरात झालेल्या स्फोटाचे काही कनेक्शन आहे का? त्यादृष्टीने देखील पोलिस तपासणी करत आहेत.

चांदोली व परिसरात काही व्यावसायिकांनी रिसॉर्ट व लॉजिंग सुरू केली आहेत. यामध्ये पर्यटक तसेच अनोळखी व्यक्तींना ओळखीचा पुरावा रेकॉर्ड बुकमध्ये नोंद न करता रुम देण्यात येत आहेत. अशामुळे दहशतवाद्यांना येथे मुक्काम केला असण्याची शक्यता आहे. या सर्व शक्यता तसेच वाढती पर्यटकांची गर्दी यामुळे परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवला असून गस्तही सुरू करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.