Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सरकारी अधिकाऱ्याचा मित्राच्या मुलीवर अत्याचार!

सरकारी अधिकाऱ्याचा मित्राच्या मुलीवर अत्याचार!



दिल्ली : खरा पंचनामा

दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. ही पीडित मुलगी संशयित अधिकाऱ्याच्या मित्राची मुलगी आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मुलगी अधिकाऱ्याच्या मित्राची मुलगी होती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी या वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत आणि कठोर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात अधिकाऱ्याच्या पत्नीवरही अत्याचारात मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. 

पीडित मुलगी बारावीची विद्यार्थिनी असल्याचे समजते. 2020 मध्ये तिच्या वडीलांचे निधन झाले. त्यानंतर आरोपीने तिला आपल्या घरी आणले. 2020 ते 2021 या कालावधीत त्याने तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. तरुणी गरोदर राहिल्यानंतर आरोपीने त्याच्या पत्नीला सांगितल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्याच्या पत्नीने कथितपणे त्यांच्या मुलाला औषधे आणण्यास सांगितले आणि घरीच गर्भधारणा संपुष्टात आणली, असे अल्पवयीन मुलीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.