Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पक्षात फूट पडली नाही तर, पवारांनी आमच्या कृतीला समर्थन द्यावे!

पक्षात फूट पडली नाही तर, पवारांनी आमच्या कृतीला समर्थन द्यावे!


मुंबई : खरा पंचनामा

अजित पवार हे आमचेचे नेते आहेत. राष्ट्रवादीत फुट नसल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. बारामतीतून कोल्हापूरच्या सभेला निघण्यापूर्वी पवारांनी हे वक्तव्य केले आहे.

काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लगेच त्याला पक्षात फूट पडली असे म्हणू शकत नाही, असे देखील पवार म्हणाले. यावर आता अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी वेळ साधली आहे.

शरद पवार यांच्या वक्तव्याचे आम्ही स्वागत करत आहोत. भुजबळ, मुंडे आणि इतर नेते देखील तुमचे कार्यकर्ते आहेत. अजित पवार तुमचे नेते आहेत तर आम्ही देखील तुमचे कार्यकर्ते आहोत. शरद पवार आमचेच आहेत. आम्ही देखील त्यांना जाऊन भेटलो आहोत. पक्षात फूट पडली नाही असे ते म्हणत आहेत, मग आता त्यांनी आमच्या या कृतीला समर्थन द्यावे, अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.