Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

खबरदार, माझा फोटो वापराल, तर कोर्टात खेचेन!

खबरदार, माझा फोटो वापराल, तर कोर्टात खेचेन!छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा

खबरदार, माझा फोटो वापराल तर, कोर्टात खेचेन, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी पत्रकर परिषदेत दिला.

छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आलेल्या पवार यांनी मी 'इंडिया'तच असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, गुरुवारी बीड येथे होणाऱ्या सभेच्या निमित्तानेही 'साहेब, आम्हाला आशीर्वाद द्या' असा मजकूर असलेले फलक बीडमध्ये झळकत आहेत. मी 'इंडिया'तच आहे, याची ग्वाही देत पवार यांनी 'पंतप्रधानांना मणिपूरपेक्षा पुन्हा सत्तेत येण्याचीच चिंता अधिक दिसते' असा टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांचा आदर्श घेत पंतप्रधान मोदी यांनी 'पुन्हा येईन'ची घोषणा केली. फडणवीस पुन्हा सत्तेत आले; पण उपमुख्यमंत्री होऊन. मोदींना काय व्हायचं आहे माहीत नाही? आम्ही भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही. जे आमच्यातून गेले त्यांच्याशीही आमचा संबंध नाही, असे त्यांनी जाहीर केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.