आरोपीला वाचवण्यासाठी इराणी नागरिकांची पोलिसांवर दगडफेक!
कल्याण : खरा पंचनामा
कल्याणमध्ये इराणी नागरिकांकडून मुंबई पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीला पकडण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांसोबत हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबईच्या डीएन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला संशयित आरोपी कल्याणच्या आंबिवली परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला होता. यावेळी पोलिसांना आरोपी दिसल्यानंतर त्यांनी त्याला पकडण्याची तयारी सरू केली होती.
दरम्यान, पोलिस आरोपीला पकडून घेऊन जात असताना तेथील इराणी नागरिकांना या घटनेची माहिती मिळाली आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. आरोपीला पोलिसांच्या तावडीतून सुटण्यास मदत होईल म्हणून त्यांनी ही दगडफेक केली पण दगडफेक होत असतानासुद्धा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.