Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

घोगसपारगाव येथे 27.27 लाखांचा गांजा जप्त चकलांबा पोलिसांची कारवाई

घोगसपारगाव येथे 27.27 लाखांचा गांजा जप्त
चकलांबा पोलिसांची कारवाई



बीड : खरा पंचनामा

जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील घोगसपारगाव येथे शेतात गांजाची लागवड करणाऱ्यास अटक करण्यात आली. यावेळी 27.27 लाखांचा 5.54 किलो गांजा जप्त करण्यात आला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलिसांनी ही कारवाई केली.

संभाजी हरिभाऊ कराड (वय 37) असे अटक केलेल्याचे नाव आहे. बीड येथील आयपीएस अधिकारी सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांना घोगसपारगाव येथे शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली. त्यांनी चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या पथकासह छापा टाकला.

त्यावेळी कराड याच्या शेतात गांजाची झाडे सापडली. पथकाने पंचनामा करून ती जप्त केली. त्याचे वजन 5.54 किलो भरले. बाजारभावानुसार त्याची किंमत 27.27 लाख रुपये आहे. याप्रकरणी कराड याला अटक करण्यात आली आहे. 

सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक नारायण एकशिंगे, उपनिरीक्षक श्री. इंगळे, श्री. तांगळे, राजेश पाटील, आनंद शिंदे, बाळासाहेब डापकर, दिलिप गीते, अनिल मंदे, संतोष गीते आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.