छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं 3 वर्षांसाठीच भारताला कर्जावर देणार!
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं महाराष्ट्रात परत आणली जाणार असल्याची घोषणा केली होती.
मात्र या वाघनखांसंदर्भात नवीन माहिती समोर आली असून ही वाघनखं केवळ 3 वर्षांसाठी भारतात आणली जाणार आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची ही वाघनखं कर्जावर महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. म्हणजेच महाराष्ट्र सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली ही वाघनखं 3 वर्ष राज्यात ठेवण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. हे पैसे सध्या या वाघनखांचा ताबा असलेल्या व्हिक्टोरिया अॅण्ड अलबर्ट संग्रहालयाला द्यावे लागणार आहेत. राज्याच्या संस्कृतिक मंत्रालयाने जारी केलेल्या शासन आदेशामध्ये याचा उल्लेख आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ही वाघनखं राज्यातील 4 वेगवेगळ्या संग्रहालयामध्ये प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. यामध्ये मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, साताऱ्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, नागपूरमधील सेंट्रल म्युझियम आणि कोल्हापूरमधील लक्ष्मी विलास पॅलेस या ठिकाणी ही वाघनखं पाहण्याची संधी सर्वसामान्यांना मिळणार आहे.
लंडनवरुन ही वाघनखं राज्यात आणण्यासाठी राज्य सरकारने 11 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. वाघनखं सुरक्षितपणे राज्यात आणण्याची जबाबदारी या 11 सदस्यांवर असणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.