Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कॉलेज कॉर्नर-संजयनगर रस्त्यावर वाढली अतिक्रमणे! सांगली महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

कॉलेज कॉर्नर-संजयनगर रस्त्यावर वाढली अतिक्रमणे!
सांगली महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष



सांगली : खरा पंचनामा

कॉलेज कॉर्नर ते नवीन वसाहतमार्गे संजयनगर कडे जाणाऱ्या रेल्वे पुलापर्यंतच्या रस्त्यावर  मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे सध्या या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हे अतिक्रमणे  तातडीने हटवावीत अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत. महापालिकेचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. याबाबत महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी लक्ष घालावे अशी मागणी जोर धरत आहे.

माधवनगर रस्त्यावरील चिंतामणी नगर येथील रेल्वे पुलाचे काम सुरू असल्याने या रस्त्यावरील वाहतूक कॉलेज कॉर्नर पासून संजयनगर मार्गे सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हा रस्ता मोठा असला तरी अतिक्रमणाच्या वेढ्यात अडकल्याने हा रस्ता अत्यंत अरुंद बनला आहे. त्यामुळे या रस्त्यावर सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे.  

दररोज छोटे-मोठे अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील विशेषतः टिंबर एरिया आणि नवीन वसाहत परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमणे  काढण्याची गरज आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्तांनी तातडीने लक्ष देऊन हा रस्ता  अतिक्रमण मुक्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत. 

सांगली  महापालिकेची सध्या अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून या रस्त्यावरील अतिक्रमण दूर करून या रस्त्याने मोकळा श्वास घ्यावा अशी  तातडीची उपाययोजना राबवावी असेही नागरिकांचे मत आहे. या रस्त्यावरील केवळ फलक आणि किरकोळ अतिक्रमणे न हटवता   बेकादेशीर बांधकामे, खोकी व इतर अतिक्रमणे काढून हा रस्ता पूर्ववत  मोठा करण्याची गरज आहे त्या दृष्टीने आयुक्तांनी संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत अशी मागणी केली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.