Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

हलगी, सनईच्या सुरांमध्ये मिरजेतील श्री. गांधी चौकच्या गणरायाचे विसर्जन

हलगी, सनईच्या सुरांमध्ये मिरजेतील श्री. गांधी चौकच्या गणरायाचे विसर्जनसांगली : खरा पंचनामा

मिरजेतील महात्मा गांधी चौक गणेश मंडळातर्फे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा या मंडळाचे 69 वे वर्ष आहे. यंदा मंडळातर्फे प्रतिभावान पत्रकारांना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. शिवाय महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले. अनंत चतुर्दशीला हलगी आणि सनईच्या सुरामध्ये श्री. गांधी चौकच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. 

मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबवले जातात. यंदा या मंडळाची विसर्जन मिरवणूक संपूर्ण मिरजेचे आकर्षणाचे केंद्र बनले होते. गारगोटी तालुक्यातील कुर येथील हलगी सम्राट सोनु मोरे आणि सनई सम्राट युवराज केंगार यांच्या सुरांनी गणेशभक्तांना भारावून टाकले. भर पावसात सनईच्या सुरावर मिरजेतील चौका-चौकात हलगी जोरदार कडाडली. हलगी आणि सनईची जुगलबंदी पाहण्यासाठी मिरजकरांनी गर्दी केली होती. डीजेच्या दणदणाटाला फाटा देत मंडळाने पारंपरिक वाद्ये वापरून गणेश विसर्जन करून एक वेगळा आदर्श निर्माण केला. 

मंडळाचे पदाधिकारी प्रभात हेटकाळे, धनंजय गडदावर, अशोक कदम, विनायक शेडबाळे, विनोद सावंत, गजेंद्र कीर, अभिषेक भोसले, इम्तियाज पठाण, पप्पू सावंत, प्रभाकर अस्वले, राजेंद्र तांबडे, प्रेम चिंतनवार आदींनी संयोजन केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.