Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'त्या' मंडळांची कुंडली काढली आहे! विशेष पोलिस महानिरिक्षक सुनिल फुलारी यांची माहिती

'त्या' मंडळांची कुंडली काढली आहे!
विशेष पोलिस महानिरिक्षक सुनिल फुलारी यांची माहिती



सांगली : खरा पंचनामा


गणेशोत्सव व ईद सणात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी दोन महिन्यापासून तयारी सुरू केली होती. पाच जिल्ह्यातील पोलिस प्रमुखांच्या बैठका घेऊन सूचना केल्या. ध्वनीप्रदुषण व नियमांचे पालन न करणाऱ्या मंडळांची कुंडली काढली. दंगल नियंत्रण पथक, राखीव दल तैनात केले. महसूल, महापालिका, जिल्हा परिषद, महावितरणसह शासकीय विभागाशी समन्वय ठेवला. परिणामकारक अशा प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. जिल्ह्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री. फुलारी यांनी आज सांगलीत गणेशोत्सव, इदच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. त्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सांगली, मिरजेतील मिरवणूक मार्गाची पाहणी केली आहे. मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही, बॅरिकेटस लावले आहेत. गणेश मंडळावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाईल.

प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून ध्वनीप्रदुषणाचे मानके घेतली आहे. पोलिसांकडून ध्वनीप्रदुषण करणाऱ्या मंडळावर गुन्हे दाखल केले जातील. तत्पूर्वी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिस ठाण्यात बोलावून सूचना केली जाणार आहे. पहिल्यादिवशी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याबद्दल मिरजेतील एका मंडळाला नोटीस दिली असल्याचेही फुलारी यांनी सांगितले.

ओरिसातील ती घटना टाळण्याचा प्रयत्न
ओरिसा येथे मिरवणुकीवेळी विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने पाच विद्यार्थ्यांचा बळी गेला. सांगली-मिरजेत अनेक मिरवणुक मार्गावर विद्युत तारा खाली आल्या आहेत. याबाबत महावितरण विभागाशी पोलिस प्रशासन संपर्क करणार आहे. ओरिसासारखी घटना टाळण्याचा पोलिसांचा प्रयत्न असून मंडळांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही फुलारी यांनी केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.