Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सोलापुरात मराठा समाज आक्रमक; सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग केला बंद!

सोलापुरात मराठा समाज आक्रमक; सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग केला बंद!सोलापूर : खरा पंचनामा

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेचा निषेध म्हणून सोलापुरातील मराठा समाजाने ठिकठिकाणी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.

शनिवारी सकाळी सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर समाज बांधवांनी रस्ता रोको आंदोलन करत सरकारचा निषेध केला.

अंबड जालना येथील मराठा समाजातील महिला, लहान मुला-मुली यांच्यावरील झालेल्या भ्याड हल्ल्याबाबत व सरकारच्या लाठी चार्ज विरोधात आंदोलन करण्यात आले. याचवेळी आंदोलनकर्त्यांनी शिंदे- फडवणीस - पवार सरकारचा निषेध केला. दरम्यान, अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.