प्रत्येकाने भान ठेवून बोलावे, वाचाळवीरांची संख्या वाढतेय!
बारामती : खरा पंचनामा
बोलताना प्रत्येकाने भान ठेवूनच बोलले पाहिजे या बद्दल दुमत नाही, सध्या वाचाळवीरांची संख्या कमालीची वाढत आहे, असे असले तरी लोकशाही मध्ये प्रत्येकाला आपले मत मांडायचा अधिकार आहे, राजकीय मते सहकारी बँकेच्या सभेत मांडू नयेत, अशा शब्दात अजित पवार यांनी आज एका कार्यकर्त्याला सल्ला दिला.
बारामती सहकारी बँकेच्या बैठकीत एका कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्या बद्दल काढलेल्या उदगाराचा संदर्भ घेत त्यांना काळे फासण्याचा इशारा दिला. या कार्यकर्त्याचे बोलणे ऐकून घेतल्यावर स्वताः माईक हातात घेत अजित पवार यांनी तुम्ही मांडलेल्या भावना समजल्या, मात्र लोकशाहीत प्रत्येकाला मतस्वातंत्र्य आहे, कोणी काय मत व्यक्त करावे हा संबंधिताचा प्रश्न आहे, सहकारी बँकेच्या सभेत राजकीय मते मांडू नयेत, कारण इथे सर्वच राजकीय पक्षांना मानणारे सभासद आहेत, हे राजकीय व्यासपीठ नसल्याचे सांगत अजित पवार यांनी संबंधित कार्यकर्त्याला सल्ला दिला.
हा सल्ला देताना प्रत्येकाने बोलताना भान ठेवूनच वक्तव्य केले पाहिजे, हल्ली वाचाळवीरांची संख्या वाढू लागल्याचा टोला लगावण्यास ते विसरले नाहीत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.