Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत तुफान राडा; थेट व्यासपीठावर फेकली अंडी

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत तुफान राडा; थेट व्यासपीठावर फेकली अंडीसांगली : खरा पंचनामा

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जोरदार राडा झाला आहे. जगाला ज्ञान देणाऱ्या गुरुजींनी वार्षिक सभेत थेट व्यासपीठावरच अंडी भिरकावली. त्यामुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत चांगलाच गदारोळ उडाला.

शिक्षक सहकारी बँकेची ७१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा डेक्कन मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या सभागृहात पार पडली. जिल्हाभरातून प्राथमिक शिक्षकांनी त्याला हजेरी लावली होती. बँकेच्या नवीन इमारत बांधकामावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू होते.

याचवेळी विरोधकांनी घोषणाबाजी करताच सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. या गोंधळाचे रूपांतर राड्यात झाले. शिक्षकांच्या या गोंधळात व्यासपीठाच्या दिशेने काही जणांनी अंडी फेकली.

त्यानंतर विरोधकांनी अंडी फेकल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला. ज्या शिक्षकांनी अंडी भिरकावली त्या शिक्षकांना चोप देण्यात आला. सत्ताधारी आक्रमक होताच विरोधकांनी नरमाईची भूमिका घेत सभागृह सोडले. यानंतर सभेचे कामकाज शांततेत पार पडले.

बँकेच्या नवीन इमारत बांधकामासह विषयपत्रिकेवरील सर्व विषय टाळ्यांच्या गजरात मंजूर करीत सत्ताधाऱ्यांनी बाजी मारली. दरम्यान, अंडी फेकणाऱ्या सभासदांवर कडक कारवाई करून सभासदत्व रद्द केले जाईल, असा इशारा बँकेच्या अध्यक्षांनी दिला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.