Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तुळजापूर-सोलापूर महामार्ग तब्बल ३ दिवस राहणार बंद!

तुळजापूर-सोलापूर महामार्ग तब्बल ३ दिवस राहणार बंद!धाराशिव : खरा पंचनामा

तुळजापूर-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. धाराशिवमधील तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या काळात सोलापूरहून पायी येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असते. यामुळे तुळजापूर- सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी 27 ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

तुळजापुरातील शारदीय नवरात्र महोत्सव ६ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर रोजी कालावधीत पार पडणार आहे. यात्रा काळात देशभरातून देवीदर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची मोठी गर्दी होते. या यात्रेसाठी सोलापूरहून भाविक पायी तुळजाभवानी मातेच्या मंदिराला भेट देतात. या महामार्गावरून पायी जाणाऱ्यांची भाविकांची संख्या प्रचंड असते. या यात्रेसाठी त्यादृष्टीने मागील दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासन, मंदिर प्रशासन व तुळजापूर नगरपालिका प्रशासन तयारी करत आहे.

या संदर्भात ही एक आढावा बैठक घेण्यात आली. ही बैठक जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत विभागनिहाय यंत्रणेकडून झालेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी प्रसारमाध्यमांना महत्वाची माहिती दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.