Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तासगाव येथील अनिल जाधव खूनप्रकरणातील सुहास अडसूळ याला जामीन मंजूर ॲड. विकास पाटील-शिरगावकर यांची माहिती

तासगाव येथील अनिल जाधव खूनप्रकरणातील सुहास अडसूळ याला जामीन मंजूर
ॲड. विकास पाटील-शिरगावकर यांची माहितीसांगली : खरा पंचनामा

तासगाव येथील अनिल जाधव खून प्रकरणातील संशयित सुहास अडसूळ याचा जामीन अजर् मंजूर करण्यात आला. सत्र न्या. एस. व्ही. पोतदार यांनी बुधवारी हा निकाल दिल्याची माहिती ॲड. विकास बा. पाटील-शिरगावकर यांनी ही माहिती दिली. 

तासगांव येथे दि. ४ ऑगस्ट २०२२ रोजी अनिल जाधव यांचा तीक्ष्ण हत्याराने खून करण्यात आला होता. खून प्रकरणी सुहास अडसुळ याला पोलिसांनी अटक केली होती. यावेळी अडसूळ याने त्याच्या हातात असलेली तलवार हवेत फिरवत मध्ये कोण आडवा आला तर मारून टाकीन अशी भाषा वापरल्याचे आरोपपत्रात म्हटले होते. 

खुनाची घटना घडल्यानंतर अडसूळ याच्यासह अन्य संशयित घटनास्थळावरून हत्यार घेऊन पळून गेले होते. त्यानंतर त्यांना पोलीसांनी अटक केली. सदर घटनेसंदर्भात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आशिष अनिल जाधव यांनी तासगांव पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती. त्यानुसार ११ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करून न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. 

यातील एक संशयित सुहास अडसुळ याच्या जामीन अर्जावर सातारचे वकील ॲड. विकास बा. पाटील-शिरगांवकर यांनी त्याला जामीनावर मुक्त करणेबाबत सखोल मुद्दे मांडले व उच्च न्यायालायाचे निवाडे सादर केले. सदरकामी ॲड. कोणार्क पाटील, ॲड. शिवराज पाटील-शिरगांवकर यांनी सहाय्यक म्हणून काम पाहीले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.