गणेशोत्सवानिमित्त सांगली जिल्ह्यात चार दिवस ड्राय डे!
सांगली : खरा पंचनामा
जिल्ह्यात सोमवारपासूनच गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. त्यातच पावसाने हजेरी लावल्याने गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चार दिवस ड्राय डेची घोषणा करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
मंगळवार दि. १९ रोजी गणेश चतुर्थी असल्याने संपूर्ण जिल्ह्यात ड्राय डे पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बुधवार दि. २० रोजी तासगाव येथील संस्थान गणपतीचे विसर्जन असल्याने वासुंबे गावासह तासगाव शहरात संपूर्ण दिवस ड्राय डे पाळण्याचे आदेश दिले आहेत.
तर शनिवार दि. २३ रोजी सांगलीतील संस्थान गणपतीचे विसर्जन असल्याने सांगली, मिरज आणि कुपवाड शहर या संपूर्ण महापालिकेच्या हद्दीत संपूर्ण दिवस ड्राय डे पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुरुवार दि. २८ रोजी अनंत चतुर्दशीनिमित्त सावर्जनीक गणपती विसर्जन तसेच ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सांगली जिल्ह्यात ड्राय डे पाळण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.