Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सावकार गणपती मंडळाला विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांची भेट

सावकार गणपती मंडळाला विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांची भेटसांगली : खरा पंचनामा

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गुरुवारी सांगली, मिरजेतील गणेशोत्सवाचा तसेच विसर्जन मार्गाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी सांगलीतील कॉलेज कॉर्नर येथील सुप्रसिद्ध सावकार गणपती मंडळाला सदिच्छा भेट देऊन श्रींची आरती केली. 


यावेळी मंडळाचे अध्यक्ष दीपक कापले यांच्याहस्ते महानिरीक्षक श्री. फुलारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फुलारी यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. तसेच यावर्षी मंडळाने साकारलेला चांद्रयान मोहिमेचा देखावाही पाहिला. यावेळी श्री. फुलारी यांनी मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक केले तसेच पदाधिकाऱ्यांना सदिच्छा दिल्या. 

यावेळी मंडळाचे संस्थापक अजिंक्य पाटील, अशोक शेठ, संचालक अशोक मासाळे, यशवंतराव माळी, राजेंद्र मुळीक, दीपक शिंदे, मुबारक उरुणकर, चंद्रकांत पाटील, नेमगोंडा पाटील यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.