Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ठाकरे गटाच्या सर्व याचिकांवर एकदाच सुनावणीची मागणी, शिंदे गटाचा आक्षेप

ठाकरे गटाच्या सर्व याचिकांवर एकदाच सुनावणीची मागणी, शिंदे गटाचा आक्षेप



मुंबई : खरा पंचनामा

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले, या फूटीनंतर आता शिवसेनेतील शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा निकाली निघणे बाकी आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आजपासून सुरूवात झाली.

सर्व राज्याचे लक्ष लागलेल्या या महत्वपूर्ण सुनावणीदरम्यान ठाकरे गटाकडून या प्रकरणातील सर्व याचिकांवर एकत्र सुणावणी घेतली जावी अशी मागणी केली. ठाकरे गटाच्या या मागणीवर शिंदे गटाकडून आक्षेप घेण्यात आला. तसेच सुनावणीच्या सुरूवातीलाच शिंदे गटाकडून प्रत्येक याचिकेवर वेगवेगळी सुनावणी घ्यावी अशी मागणी केली, यानंतर राहुल नार्वेकर यांनी प्रत्येक याचिकेवर वेगवेगळी सुनावणी होईल असे जाहीर केले.

दरम्यान विधान भवनात विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू असलेल्या आजच्या सुनावणीत ठाकरे गटाकडून युक्तीवादाला सुरुवात करण्यात आली. ठाकरे गटाकडून सुरुवातीला देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. यादरम्यान ठाकरे गटाकडून कागदपत्रे सादर करण्यात आल्याने सुनावणीला सुरूवात झाली.

यानंतर शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांपुढे मोठा युक्तीवाद करण्यात आला. आम्हाला याचिकेची कागदपत्रे मिळाली नाहीत. ठाकरे गटाकडून जी याचिका दाखल करण्यात आली होती त्याची कागदपत्रे मिळाली नाहीत, तसेच कागदपत्रे मिळाली नसल्यानं बाजू मांडण्यास अडचण येत असल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात आलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.