Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरजेतील श्री गांधी चौक गणेशोत्सव मंडळातर्फे पत्रकारांचा सन्मान! पालकमंत्र्यांच्याहस्ते विकास गोंधळे, अरूण लोंढे, संजय देसाईंना मानपत्र प्रदान

मिरजेतील श्री गांधी चौक गणेशोत्सव मंडळातर्फे पत्रकारांचा सन्मान!
पालकमंत्र्यांच्याहस्ते विकास गोंधळे, अरूण लोंढे, संजय देसाईंना मानपत्र प्रदानसांगली : खरा पंचनामा


मिरजेतील महात्मा गांधी चौक गणेश मंडळातर्फे मान्यवरांचा गौरव व अन्नदानाचे कार्यक्रम घेण्यात आला. या मंडळाचे 69 वे वर्ष आहे. यंदा मंडळातर्फे प्रतिभावान पत्रकारांना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सांगली दर्पणचे संपादक विकास गोंधळे, सी न्यूचे प्रतिनिधी अरूण लोंढे, लोकशाही न्यूजचे प्रतिनिधी, एसबीएनचे संपादक संजय देसाई यांचा समावेश आहे. 


यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याहस्ते मंडळातर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी जनसुराज्य युवाशक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे, माजी नगरसेवक गणेश माळी, माजी नगरसेवक संदीप आवटी, काँग्रेसचे सचिन जाधव, उद्योजक अतुल खोत आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी मंडळाचे पदाधिकारी प्रभात हेटकाळे, धनंजय गडदावर, अशोक कदम, विनायक शेडबाळे, विनोद सावंत, गजेंद्र कीर, अभिषेक भोसले, इम्तियाज पठाण, पप्पू सावंत, प्रभाकर अस्वले, राजेंद्र तांबडे, प्रेम चिंतनवार आदींनी संयोजन केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.