सुऱ्याचा धाक दाखवत आईसमोरच मुलीवर सामूहिक बलात्कार; एकाला अटक
मुंबई : खरा पंचनामा
आईसमोरच तिच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना मुंबईत घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबईच्या मुलुंड भागात ही घटना घडली आहे. सामूहिक बलात्कार झालेली पीडित मुलगी व 15 वर्षांची आहे.
आरोपींनी आईला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आणि अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार केला. या प्रकरणी आता एका आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 15 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. चाकूचा धाक दाखवलून तसंच आईल जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर या नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. मुलुंड पोलिसांनी सामुहिक बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या आरोपीच्या शोधात पोलिसांचे पथक परराज्यात रवाना झाली आहे. गुंगीचं औषधं देऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी वेगवेगळ्या अँगलने तपास सुरू केला असल्याची माहिती समोर आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.