Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

इचलकरंजीतील जर्मनी गँगचा म्होरक्या आनंद्याला अटक!

इचलकरंजीतील जर्मनी गँगचा म्होरक्या आनंद्याला अटक!इचलकरंजी : खरा पंचनामा 

इचलकरंजी येथील व्यावसायिक अपहरण प्रकरणातील कुख्यात जर्मनी गॅंगचा म्होरक्या गुंड आनंद्या याला शहापूर पोलिसांनी अटक केली.  सांगली जिल्ह्यातील खानापूर येथून त्याला अटक करण्यात आली.

आनंदया उर्फ आनंद शेखर जाधव उर्फ जर्मनी (वय 26, रा. जवाहर नगर इचलकरंजी) असे त्याचे पूर्ण नाव आहे. त्याला आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीशांनी त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी 15 पैकी 13 संशयितांना यापूर्वी अटक केली आहे.  ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

शहापूर येथील रियल इस्टेट व्यवसाईक सरदार अमिन मुजावर यांना महिन्यापूर्वी कोयत्याचा धाक दाखवत, अपहरण करून, पेट्रोलने जाळून मारण्याची धमकी देऊन, महापुरुषाबद्दलचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन जर्मनी गॅंगच्या टोळीने 19 तोळे सोन्यासह चार लाख रुपये रोख असा एकूण 11 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला होता.

आनंदा जर्मनी हा महिना भरापासून पोलिसांना चकवा देत होता. खबऱयाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार तो सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे असल्याचे शहापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकास समजले. त्यानुसार त्यांनी विटा पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. गुन्हा घडल्या तारखेपासून तो कराड, निपाणी, शिर्डी, गोवा, मुंबई आदी ठिकाणी फिरत होता. त्याने वेळोवेळी मोबाईल सिम कार्ड ही बदलत त्याने पोलिसांना राज्यभर फिरवले. तरीही पोलिसांनी त्याला शोधून काढून अटक केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.