Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बापांच्या रक्षणासाठी झोपलेल्या कार्यकर्त्यांचेच मोबाईल केले लंपास! विश्रामबागमधून पाच, एरंडोलीतून एक मोबाईल चोरीस

बापांच्या रक्षणासाठी झोपलेल्या कार्यकर्त्यांचेच मोबाईल केले लंपास!
विश्रामबागमधून पाच, एरंडोलीतून एक मोबाईल चोरीससांगली : खरा पंचनामा

शहारात साडेतीनशेवर गणेशोत्सव मंडळात बाप्पा विराजमान झाले आहे. रात्री मंडपात मुर्तीच्या देखभालीसाठी कार्यकर्ते झोपतात. शहरातील सांगली-मिरज रस्त्यावरील मंडळातून पाच मोबाईल पहाटे चोरीला गेले. तर मिरज तालुक्यातील एरंडोली येथील मंडळातूनही एक मोबाईल चोरीस गेला. 

गणेशोत्सव मंडळात उत्साही तर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषी वातावरण आहे. नित्य कार्यक्रमासह सायंकाळी मंडळात निवासासाठी मंडळातील काही कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाते. पहाटेच्या सुमारास त्यांचा डोळा लागल्याची संधी साधून चोरटे मोबाईलसह ऐवज लंपास करत आहे. असाच प्रकार गेस्ट हाऊसजवळील एक मंडळात झाला. काल नेहमीप्रमाणे सात कार्यकर्ते निवासासाठी होते. पहाटे साडेतीन पावणे चारच्या सुमारास चोरट्यांनी तेथील पाच मोबाईल पळवून नेले. याबाबत शुभम प्रविण टाकणे (वय २५) याने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शुभम याचे दोन मोबाईल, यश आडके याचे दोन मोबाईल आणि अक्षय माने याचा एक मोबाईल चोरट्याने चोरून नेला. एकुण चाळीस हजारांचा मुद्देमाल चोरट्यांना लंपास केला. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद आहे.

दरम्यान, एरंडोली (ता. मिरज) येथील मळ्यातील नवरंग मंडळातूनही एक मोबाईल चोरीस गेला. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.