Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगली जिल्ह्यात कडकडीत बंद! गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची जोरदार मागणी

सांगली जिल्ह्यात कडकडीत बंद!
गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची जोरदार मागणी


सांगली : खरा पंचनामाजालना लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या वतीने आज गुरुवारी सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळून रस्ता रोको, निदर्शने करण्यात येत आहेत. तर सांगलीमध्ये सकल मराठा समाजाच्यावतीने भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत महिलांसह मराठा समाजातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आलीय.


जालना मधील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाकडून आज सांगली जिल्हा बंदची हाक दिली आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर सांगली आगारातील  जिल्ह्यातील , शहरातील आणि जिल्हाबाहेरील बस वाहतूक खबरदारी म्हणुन बंद करण्यात आली आहे.


जालना मधील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाकडून आज सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आली असून  बंदच्या पार्श्वभूमीवर सांगली आगारातून सुटणारी जिल्ह्यातील, शहरातील आणि जिल्हाबाहेरील बस वाहतूक खबरदारी म्हणुन बंद केली आहे. सांगली पोलिसांनी दिलेल्या सुचनेनंतर सांगली एस टी  बसस्थानक प्रशासनाने हा  निर्णय घेतला आहे. 

सांगली शहरात बंदला देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. तसेच गावागावात कडकडीत बंद पाळून ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले आहे. त्याचबरोबर सांगली मध्ये  बाईक रॅली काढण्यात आली आहे. या आंदोलनाला सर्व संघटनांनी पाठिंबा दिला आहे. तसेच शिवप्रतिष्ठांनचे संभाजी भिडे यांनी सुद्धा आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. त्याचबरोबर शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करण्यात यावे असे आवाहन देखील केले आहे.. या बंद मध्ये शाळा कॉलेज बंद ठेवून पाठिंबा दिला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.