Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चांगल्याला चांगलं म्हणू, सतेज पाटलांचं कौतुक करु : महाडिक

चांगल्याला चांगलं म्हणू, सतेज पाटलांचं कौतुक करु : महाडिक



कोल्हापूर : खरा पंचनामा

थेट पाईपलाईनचे पाणी आल्यावर आम्ही काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचे स्वागत करू,असं भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटलं. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

सतेज पाटील यांनी कोणत्या निधीमधून एसी बस आणल्या माहीत नाही. पण कोल्हापूरकरांसाठी सुविधा मिळते हे महत्वाचे आहे, असंही धनंजय महाडिकांनी सांगितलं.

मी देखील कोल्हापुरात 100 इलेक्ट्रिक बस आणणार हे सांगितलं होतं. त्या बस लवकरात लवकर आणण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. थेट पाईपलाईनचे पाणी कोल्हापुरात येणार आहे. त्या कामाचे आम्ही देखील स्वागत करणार. पण थेट पाईपलाईनचे काम किती वर्षे चाललं, अजून किती वेळ लागणार यात जात नाही. चांगल्या कामाबद्दल चांगलं म्हटलं पाहिजे. पण आम्ही केलेल्या कोणत्याही कामाचं स्वागत सतेज पाटील करत नाहीत, असंही धनंजय महाडिक म्हणाले.

जे चांगलं काम होईल त्याचं कौतुकच होणार आहे. उद्या थेट पाईपलाईन जरी पूर्ण झाली तरी आम्ही त्यांचं कौतुक करू, अभिनंदनच करू. भविष्यात देखील विकासकामं करत असताना एकमेकांचे श्रेय मी तर कधीच घेत नाही आणि दुसऱ्यांनी देखील तसंच करावं चांगल्या कामांचे कौतुक करावं, असा अप्रत्यक्ष सल्ला महाडिकांनी सतेज पाटलांना दिला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.