Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सख्ख्या भाचीवर अघोरी विद्येचा प्रयोग करणाऱ्या तीन मामांना अटक! चकलांबा पोलिस वेळेवर पोहोचल्याने टळला अनर्थ

सख्ख्या भाचीवर अघोरी विद्येचा प्रयोग करणाऱ्या तीन मामांना अटक!
चकलांबा पोलिस वेळेवर पोहोचल्याने टळला अनर्थबीड : खरा पंचनामा

भूत लागले आहे असे सांगत ते उतरवण्यासाठी आपल्याच सख्ख्या भाचीवर अघोरी विद्येचा प्रयोग करणाऱ्या तीन मामांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या घटनेची वेळीच माहिती मिळाल्याने चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे पथकासह घटनास्थळी पोहचल्याने मोठा अनर्थ टळला. भाचीवर असा अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर वेळीच कारवाई झाल्याने चकलांबा पोलिसांचे कौतुक होत आहे. 

संजय रावसाहेब नवगिरे, गणेश रावसाहेब नवगिरे, दिलीप रावसाहेब नवगिरे (सर्व रा. मुंगी ता. शेवगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मुलीचे वडील एकनाथ दगडू खंडारे (रा. पाथरवला) यांनी फियार्द दिली आहे. शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास मौजे पाथरवाला खुर्द येथे भुत उतरवण्यासाठी अमानुष कृत्य करुन जादूटोणा होत असल्याबाबत चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे यांना मौजे बोरगाव येथील सरपंच संदीप जाधव यांनी माहिती दिली. एका वस्तीवर एका मुलीवरती बंद खोलीमध्ये रात्रभर बाहेरगावचे काही लोक अघोरी विद्येचा प्रयोग करत असून ती मुलगी जोरजराने किंचाळत आहे. तसेच अघोरी विद्या करणारे लोक हे मोठमोठ्याने आरडा ओरड करत आहे, अशीही माहिती सरपंच जाधव यांनी श्री. एकशिंगे यांना दिली. 

याची माहिती मिळताच श्री. एकशिंगे यांनी घटनास्थळी पथक पाठवले. त्यानंतर पथकाने तेथे जाऊन पीडित मुलीची सुटका केली. त्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी आईसोबत रूग्णालयात पाठवण्यात आले. मुलीला बंदिस्त खोलीतून सोडवल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. चकलांबा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार श्री. पवार, श्री. रूईकर यांनी ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.