Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

माजी महापौराच्या भावाने गोळी झाडून पत्नीचा केला खून; त्यानंतर भावाचाही मृत्यु

माजी महापौराच्या भावाने गोळी झाडून पत्नीचा केला खून; त्यानंतर भावाचाही मृत्युठाणे : खरा पंचनामा

ठाण्याचे माजी महापौर गणेश साळवी यांचा मोठा भाऊ व बांधकाम व्यावसायिक दिलीप साळवी यांनी आपल्या पत्नीवर गोळी झाडून तिचा खून केला. त्यानंतर त्यांचा ही मृत्यु झाला आहे. ही घटना कळव्यातील मनीषानगरमधील कुंभारआळीत शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. दिलीप साळवी हे बांधकाम व्यावसायिक होते. प्रमिला साळवी असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. 

दिलीप आणि त्यांची पत्नी प्रमिला यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरु होता. हे दोघे घरात असताना शुक्रवारी रात्री त्यांच्यात वाद झाला. तेव्हा रागाच्या भरात दिलीप याने पत्नीवर गोळी झाडून तिचा खून केला. गोळीबाराचा आवाज ऐकून सर्वांनी तिकडे धाव घेतली. दरवाजा उघडल्यानंतर दिलीप साळवी हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. त्यामुळे पत्नीवर गोळी झाडल्यानंतर त्यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा संशय आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. परंतु, तोपर्यंत त्यांचा मृत्यु झाला होता. 

दिलीप साळवी यांच्या अंगावर कोणत्याही जखमा नव्हत्या. त्यामुळे गोळी लागून त्यांचा मृत्यु झाला नसल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. गोळीबार केल्यानंतर त्यांना हार्ट अॅटक आला व ते रक्ताच्या थारोळ्यात पडले असावेत, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला गेला. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्युचे नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.